अँपल दरवर्षी सप्टेंबरमध्ये आपला नवीन iPhone लॉन्च करतं आणि यंदाही असा समज आहे की iPhone 17 सीरीज त्याच वेळी सादर होईल. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी या वेळी ‘Plus’ मॉडेल काढून टाकून एक नवीन आणि अधिक पातळ व्हेरिएंट सादर करू शकते, ज्याचं नाव iPhone 17 Air किंवा iPhone Slim असू शकतं. मात्र, Apple कडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
ही माहिती खरी ठरली तर अँपल iPhone 17 सीरीजमध्ये एकूण चार मॉडेल्स असतील
iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max, आणि iPhone 17 Air.
iPhone 17 Pro Max मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी?
iPhone संदर्भातील अफवा आणि लीक जशी लॉन्चच्या जवळ येतात तशी जोरात होतात. नुकत्याच एक टिप्स्टर Instant Digital ने Weibo वर दावा केला आहे की यंदा iPhone 17 Pro Max मध्ये 5,000mAh ची बॅटरी असू शकते, जी आतापर्यंतच्या कोणत्याही iPhone मधील सर्वात मोठी बॅटरी ठरेल.
टिप्स्टरने गेल्या काही वर्षांतील iPhone Pro Max बॅटरी क्षमतेचा आढावा दिला:
- iPhone 11 Pro Max – 3,969mAh
- iPhone 12 Pro Max – 3,687mAh
- iPhone 13 Pro Max – 4,352mAh
- iPhone 14 Pro Max – 4,323mAh
- iPhone 15 Pro Max – 4,422mAh
- iPhone 16 Pro Max – 4,676mAh
- iPhone 17 Pro Max – सुमारे 5,000mAh (लीकनुसार)
तज्ञांचे म्हणणे आहे की बॅटरी क्षमता वाढत आहे, पण यामुळे बॅटरी लाइफ किती सुधारेल हे डिव्हाईस किती ऊर्जा वापरतो यावर अवलंबून आहे. म्हणजेच, 10% मोठी बॅटरी असली तरी 10% जास्त बॅकअप मिळेलच असे नाही.
इतर अपेक्षित वैशिष्ट्ये
iPhone 17 Pro Max मध्ये A19 Pro चिपसेट असण्याची शक्यता आहे आणि तो iOS 26 वर चालेल, जो अलीकडेच WWDC इव्हेंटमध्ये सादर झाला आहे. नवीन ऑपरेटिंग सिस्टम iPhone मध्ये Liquid Glass इंटरफेस घेऊन येईल. डिस्प्ले आधीप्रमाणे 6.9 इंचाचा असेल, पण कॅमेरा विभागात आणखी एक नवीन सुधारणा दिसू शकते. Apple या वेळी काही मोठं आणि नवीन घेऊन येण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे कंपनीने केवळ मागील मॉडेल्सना मागे टाकणं नाही तर बाजारात आपली पकड अजून मजबूत करणे अपेक्षित आहे.
हे पण वाचा :- iPhone 17 Pro Max नवीन फीचर्स आणि अपेक्षा, आयफोन १७ सीरीजमध्ये होणार अनेक बदल, डिझाइन आणि फीचर्स लीक